Also visit www.atgnews.com
सीए इंटर आणि फाउंडेशन निकाल कधी? अधिकाऱ्यांनी दिली माहिती
CA Intermediate CA Foundation Result Update: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने अलीकडेच फायनलचा निकाल जाहीर केला आहे. आता विद्यार्थ्यांना सीए इंटरमीडिएट (CA Intermediate) आणि सीए फाउंडेशन (CA Foundation) च्या निकालाची प्रतीक्षा आहे. या दोन्ही कोर्सेसचे निकाल कधी जारी होणार यासंबंधी आयसीएआयच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. आयसीएआयचे सीसीएम (ICAI CCM) धीरज खंडेलवाल यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी १ फेब्रुवारीला ट्वीट करून सांगितले होते की चार्टर्ड अकाउंटंट इंटर आणि फाउंडेशनचे संभाव्या निकाल ३ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केले जातील. आता त्यांनी एक ट्विट करून सांगितले आहे की निकालाच्या घोषणेला थोडा अवधी लागेल. पुढची संभाव्य तारीख ७ किंवा ८ फेब्रुवारी आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी आयसीएआयच्या नोटिफिकेशनची वाट पाहावी लागेल. आपली वेबसाइट icai.org सह अन्य दोन वेबसाइट्स वर निकाल जारी करणार आहे. विद्यार्थी रजिस्टर्ड ई-मेल आईडी आणि एसएमएस द्वारे आपला निकाल मिळवू शकणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LgwyYe
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments