गुडन्यूज! एचसीएल टेकमध्ये होणार एक हजार कर्मचाऱ्यांची भरती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई एचसीएल टेक्नॉलॉजीजने तिच्या नागपूरमधील मिहान येथील प्रकल्पात एक हजार नवे कर्मचारी घेण्याचे ठरवले आहे. ही नोकरभरती महिन्याभरात पूर्ण होईल. यामध्ये अननुभवी व अनुभवी असे दोन्ही व्यावसायिक घेतले जाणार आहेत. या एक हजार पदांसाठी कॉलेजांतून नुकतेच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्यांनाही संधी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मिहानमध्ये एचसीएलचा ५० एकर जागेतील प्रकल्प एप्रिल २०१८ पासून दोन हजार कर्मचाऱ्यांसह कार्यान्वित आहे. हे केंद्र आता अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वारे जगभरातील प्लॅटिनम प्रमाणित प्रकल्पाच्या 'एलिट लीग'चा भाग आहे. या प्रकल्पात अभियांत्रिकी, अनुसंधान व विकास सेवा (ईआरएस) आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवा व्यवसाय विकसित केले जातात. याखेरीज एचसीएल नागपूरतर्फे 'कम बॅक होम' ही मोहीम राबवली जात असून या अंतर्गत नागपुरातील आयटी तज्ज्ञांना त्यांच्या घरी परत बोलवून ईआरएस, अॅप्लिकेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवेमध्ये करियर घडवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. तसेच 'स्टे रूटेड' ही मोहीम कंपनी पदवीधरांसाठी राबवत असून त्यांच्या स्वतःच्या शहरात जागतिक पातळीवर संधी निर्माण करण्यावर याअंतर्गत भर दिला जात आहे. दोन वर्षांपासून २० वर्षांपर्यंतच्या अनुभवी व इच्छुक आयटी व्यावसायिकांनी recruit.nagpur@hcl.com वर अर्ज करावा, असे आवाहन एचसीएल टेक्नॉलॉजीजने केले आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oRHyZZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments