पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंत टीईटी बंधनकारक

म. टा. प्रतिनिधी, पुणे नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते आठवीसाठी सध्या अनिवार्य असलेली (टीईटी) आता पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंत लागू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) 'टीईटी'संदर्भात समिती नियुक्त केली आहे. ही समिती देशभरातील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) संदर्भातील आढावा घेऊन अहवाल सादर करेल. शिक्षक होण्यासाठी 'एनसीटीई'ने ठरवलेल्या पात्रतेनुसार टीईटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिक्षक आणि शिक्षकांच्या पात्रतेबाबत काही बदल होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उच्चशिक्षित, व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित, साधनसुविधायुक्त, ध्येयवादी शिक्षकांची गरज आहे. त्यासाठी 'एनसीटीई'ने शिक्षकांच्या शिक्षणाबाबत काही महत्त्वाचे बदल करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. ही समिती १५ फेब्रुवारीपर्यंत 'सीबीएसई'कडून माहिती घेईल. त्यानुसार पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या 'टीईटी'ची रचना, परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना ३१ मार्चपूर्वी सादर करील. 'एनसीटीई'ने २०११ मध्ये राज्यातील आणि 'सीबीएसई'च्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य केली होती. मात्र, या संदर्भात काही आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे त्या संदर्भातील अडीअडचणी, आक्षेपांचाही अभ्यास ही समिती करणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jy4s7v
via IFTTT

Post a Comment

0 Comments