Also visit www.atgnews.com
IBPS RRB स्केल १ मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने RRB ऑफिसर स्केल 1 पदांसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा आयबीपीएस आरआरबी निकाल अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे. मुख्य परीक्षेत पात्र होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. IBPS ने सांगितले, 'मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी ऑनलाइन मुख्य परीक्षेत मिळालेले गुण उमेदवारांना सांगण्यात येणार नाहीत.' मुलाखतीसाठी एकूण १०० गुण आहेत. दरम्यान, बँकिंग जॉब्सची (Banking Jobs) तयारी करणार्या तरुणांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकारी बँकांमध्ये शासकीय बँक रिक्त पदासाठी (Government Bank vacancy) परीक्षा घेत असलेल्या IBPS या संस्थेने २०२१ या वर्षातील परीक्षांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. यानुसार, क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये कार्यालय सहाय्यक आणि अधिकारी पदांच्या निवडीसाठी पूर्व परीक्षा १ ऑगस्टपासून आयोजित करण्यात येणार आहे. ऑफिसर स्केल २ आणि ३ साठी एकच परीक्षा होईल. ही परीक्षा २५ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाईल. कार्यालय सहाय्यकासाठी मुख्य परीक्षा ३ ऑक्टोबर आणि ऑफिसर स्केल १ पोस्टसाठी मुख्य परीक्षा २५ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाईल. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jEPugc
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments