पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशांसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात

Admissions for 's Mumbai Public School: मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ज्या मुंबई पब्लिक स्कूल्सची घोषणा केली, त्या दहा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेशांसाठी २५ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी या दहा शाळांमध्ये प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. केजी ते इयत्ता सहावीपर्यंतच्या वर्गांमध्ये प्रवेश होणार आहेत. अर्ज कसा करायचा? - मुंबई पब्लिक स्कूल्सच्या अधिकृत पोर्टलवर जा. - 'Apply here' या पर्यायवर क्लिक करा. - दिलेल्या सर्व सूचनांनुसार अर्ज भरा. - अर्ज भरून सबमीट करा. कोणकोणत्या प्रभागात आहेत या शाळा? प्रभाग -- शाळा एल - तुंगा व्हिलेज, नवीन इमारत एन - राजावाडी मनपा शाळा एफ - उत्तर - कानेनगर, मनपा शाळा जी- उत्तर -- भवानी शंकररोड शाळा के - पश्चिम - प्रतीक्षा नगर मनपा शाळा एम- पूर्व -२ - अझीझ बाग मनपा शाळा पी- उत्तर -- दिंडोशी मनपा शाळा पी - उत्तर -- जनकल्याण नवीन इमारत टी-मिठानगर शाळा, मुलुंड एस-हरियाली व्हिलेज, मनपा शाळा विक्रोळी या व्यतिरिक्त छोटा शिशू विद्यार्थ्यांसाठी MPS पूनम नगर (CBSE) आणि MPS वुलन मिल (ICSE) या दोन्ही शाळांसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37UILtT
via IFTTT

Post a Comment

0 Comments