JEE Main 2021: पहिल्या टप्प्यात ९५ टक्के विद्यार्थी उपस्थिती

JEE Main 2021: देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन मुख्य २०२१() चा पहिला टप्पा संपला आहे. ही प्रवेश परीक्षा यंदा चार टप्प्यात आयोजित केली जाणार आहे. २३ फेब्रुवारीपासून पहिला टप्पा सुरू झाला होता. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवर या परीक्षेसंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की पहिल्याच सत्राला ९५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यात आली आहे. त्यांनी असे ट्विट केले आहे की, 'जेईई मेन्सच्या प्रथम टप्प्प्यातील उपस्थिती ९५ टक्के होती, याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की भविष्यातही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यशस्वीपणे या परीक्षएचे आयोजन करेल.' जेईई मेन्स परीक्षा मंगळवारी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू झाली. यंदा पहिल्यांदाच १३ भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मराठीसह असामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराथी अशा १३ भाषांमध्ये ही परीक्षा झाली. यावर्षी विद्यार्थ्यांना आपला स्कोअर सुधारण्याची संधी देण्यासाठी वर्षातून चार वेळा परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. पुढील सत्र मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'परीक्षा ३११ शहरातील ८२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. यात परदेशातील १० केंद्रांचा समावेश आहे. बहारीन, कोलंबो, दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाद, शारजाह, सिंगापूर आणि कुवेत या विदेशातील शहरांमध्ये देखील या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व केंद्रांवर कोविड-१९ महामारी सुरक्षेसंबंधीच्या नियमांचे पालन करण्यात आले.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2O3XOdJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments