CBSE दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE Exam DateSheet 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या तारखांची घोषणा केली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार या परीक्षा १० जून २०२१ पर्यंत सुरू राहणार आहेत. पोखरियाल म्हणाले, 'दोन पेपरच्या मध्ये अंतर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त पद्धतीने परीक्षा देता येतील.' प्रतिकूल परिस्थितीत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोखरियाल यांनी कौतुक केले. शिक्षकांनीही कोविड योद्ध्याप्रमाणे काम केले असे सांगत त्यांनी त्यांच्या कामाप्रति आभार मानले. विद्यार्थ्यांनी परीक्षांची नीट तयारी करावी असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांची कशाप्रकारे संवाद साधला ते ऐका - सीबीएसई दहावी परीक्षांचे वेळापत्रक - सीबीएसई बारावी परीक्षांचे वेळापत्रक -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aoM0Kl
via IFTTT

Post a Comment

0 Comments