Also visit www.atgnews.com
UGC NET 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) राष्ट्रीय पात्रता परीक्षा २०२१ () जाहीर केली आहे. यूजीसी नेट २०२१ परीक्षेची अधिसूचनाही जाहीर केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक (निशंक) यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. परीक्षेची तारीख, अर्जाची संपूर्ण माहिती वाचा. एनजीएने यूजीसी नेट डिसेंबर २०२० च्या परीक्षेसाठी ही परिपत्रक जारी केले आहे. करोना विषाणूच्या महामारीमुळे ही परीक्षा निर्धारित वेळेत घेता आली नाही. अर्जही भरून घेण्यात आले नव्हते. आता ही परीक्षा मे २०२१ ( May 2021) मध्ये घेतली जाईल. अर्ज प्रक्रिया देखील आता सुरू होतील. अधिसूचनेनुसार सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) आणि जेआरएफ (JRF) पात्रतेसाठी यूजीसी नेटची परीक्षा ०२ मे २०२१ पासून सुरू होईल. मे २०२१ च्या २, ३, ४, ५, ६, ७, १०, ११, १२, १४ आणि १७ रोजी परीक्षा असतील. ऑनलाईन पद्धतीने दररोज दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ अशी असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल. अर्ज कसा कराल? या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ०२ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू केली जात आहे. अंतिम मुदत ०२ मार्च २९२१ पर्यंत आहे. ०३ मार्च २०२१ पर्यंत अर्ज जमा करता येतील. अर्ज प्रक्रिया यूजीसी नेट वेबसाइट ugcnet.nta.nic.in द्वारे पूर्ण करावी लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2MuNgUh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments