College Reopening: महाविद्यालये, विद्यापीठांसाठी UGC च्या गाइडलाइन्स

कोविड - १९ महामारीनंतर आता हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात देशातील बहुतांश राज्ये महाविद्यालये आणि विद्यापीठांची दारे उघडत आहेत. मार्च २०२० पासून शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. मात्र आता योग्य त्या आरोग्यविषयक खबरदारीसह महाविद्यालये सुरू होत आहेत. महाराष्ट्रातही १५ फेब्रुवारीपासून कॉलेजे उघडणार आहेत. अशात विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्याच दृष्टिने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यानुसार, महाविद्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. - यूजीसीच्या या गाइडलाइन्सनुसार, कोव्हिड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वर्गाातील विद्यार्थ्यांची संख्या कमी ठेवावी. - कॉलेज उघडण्यापूर्वी केंद्र वा राज्य सरकारने तो कॅम्पस सुरक्षित आहे असे जाहीर करणे अनिवार्य आहे. - विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करणे अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम देखील काटेकोरपणे पाळायला हवेत. - विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रत्येक संस्थेने समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही यूजीसीने केली आहे. - विद्यार्थ्यांशी नियमितपणे फोन, ईमेल, डिजीटल किंवा सोशल मीडियी प्लॅटफॉर्मद्वारे संवाद साधावा आणि त्यांचा नियमित मार्गदर्शन करावे, असेही यूजीसीने सांगितले आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांनी हेल्पलाइन सुरू कराव्यात अशा सूचना आहेत. - महाविद्यालयाबाहेरच्या कोणत्याही अॅक्टिव्हिटी करू नयेत. उदा. फिल्ड ट्रीप, स्टडी टूर आदी. - विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. राज्यात १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार कॉलेज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग येत्या १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीत सुरू होणार आहेत. दरम्यान, करोना महामारी पार्श्वभूमीवर तूर्त तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील ७५ टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात आली आहे. सध्या केवळ ५० टक्के उपस्थितीने महाविद्यालये सुरू होणार असली तरी ५ मार्चनंतर १०० टक्के सुरू करण्याचा विचार हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aLUxHC
via IFTTT

Post a Comment

0 Comments