CTET January 2021 Result: राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. CBSE CTET 2021 निकाल सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते या संकेतस्थळाला भेट देऊन आपला वैयक्तिक निकाल पाहू शकतील. निकाल डाऊनलोडही करता येईल. या वृत्तात निकाल पाहण्याची आणि डाऊनलोड करण्याची थेट लिंकही देण्यात आली आहे. ही परीक्षा रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. एकूण ४ लाख १४ हजार ७९८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. यापैकी २ लाख ३९ हजार ५०१ उमेदवार पेपर १ मध्ये यशस्वी झाले आहेत. कसा डाऊनलोड कराल? उमेदवारांना पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप CTET January 2021 Result पाहता आणि डाऊनलोड करता येईल - १) निकालाचे अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वर जा. २) होमपेजवरील 'CTET January 2021 Result' या पर्यायावर क्लिक करा. ३) आता नवे वेब पेज उघडेल. ४) येथे तुमचा रोल नंबर भरून सबमीट बटण क्लिक करा. ५) आता निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ६) भविष्यातील संदर्भासाठी याची एक प्रत घेऊन ठेवा. CTET January 2021 पात्रता प्रमाणपत्र ज्या उमेदवारांनी CTET January 2021 परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकरमध्ये उपलब्ध असतील. पात्र उमेदवार डिजीलॉकरमधून आपले प्रमाणपत्र आपल्या लॉगइन डिटेल्सच्या सहाय्याने घेऊ शकतील. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2O7ejWs
via IFTTT

Post a Comment

0 Comments