Also visit www.atgnews.com
Education Budget 2021: उच्च शिक्षण, संशोधनासाठी भरीव तरतूद
शिक्षण क्षेत्रासाठी २०२० हे शैक्षणिक वर्ष प्रचंड अडचणींचे ठरले आहे. करोना महामारी आणि त्यामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रात अनेक अभूतपूर्व बदलही पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीवर २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रासाठी काय भरीव तरतूद, घोषणा केल्या हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यंदाच्या अर्थसंकल्पात उच्च शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषत: संशोधन क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. संशोधनासाठी पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने ५० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील शिक्षण क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे - - उच्च शिक्षणासाठी बनणार आयोग - १०० नव्या सैनिक शाळांची घोषणा. सध्या देशात ३१ सैनिकी शाळा कार्यरत आहेत. नव्या सैनिकी शाळांच्या निर्मितीसाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. विशेषत: एनजीओ म्हणजेच बिगर शासकीय संस्थाच्या सहकार्याने या सैनिका शाळांची निर्मिती होणार आहे. - २०१९ च्या अर्थसंकल्पात नॅशनल रिसर्च फाउंडेशन स्थापन करण्याची घोषणा केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात या फाउंडेशनसाठी पुढील पाच वर्षांत ५० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. - देशभरात १५ हजार आदर्श शाळा उघडणार. १५ हजार शाळांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्यात येणार आहे. - लेह येथे केंद्रीय विद्यापीठाची स्थापना होणार. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39yCKEq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments