Also visit www.atgnews.com
FYJC Online: प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम फेरी
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत प्रवेशासाठी विविध फेऱ्या पार पडल्या. मात्र तरीही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांसाठी एक अंतिम फेरी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांनी १३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहे. अंतिम फेरीचे वेळापत्रक आणि नियोजन पुढीलप्रमाणे असेल - १) या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल आणि १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. २) ही प्रवेशांचि अंतिम फेरी असणार आहे. २०२०-२१ च्या प्रवेशांसाठी १३ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक आहे. यानंतर अकरावीचे प्रवेश बंद होतील. ३) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर हे प्रवेश होणार आहेत. प्रवेशांचे वेळापत्रक - ५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ - ऑनलाइन अर्ज भरणे, प्रवेश रद्द करणे (आवश्यकता असल्यास), मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज पडताळणी करणे ८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ - प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर प्रवेशांची फेरी सुरू. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार ८ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२१ - अलॉटमेंट मिळाल्यावर प्रोसिड फॉर अॅडमिशन हा पर्याय क्लिक करणे. दिलेल्या कॉलेजमधील प्रवेश निश्चित करणे. १३ फेब्रुवारी २०२१ (सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत) - कॉलेजांनी झालेल्या प्रवेशांची स्थिती दर्शवणे १४ फेब्रुवारी २०२१ - रिक्त जागा आणि अंतिम प्रवेश स्थिती जाहीर करणे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rsturg
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments