Also visit www.atgnews.com
JEE Main 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच होणार जारी
Admit Card Update: इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात मेन (JEE Main) परीक्षा २०२१ चे अॅडमिट कार्ड या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जेईई मेनचे अॅडमि ट कार्ड उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली होती. यावर्षी जेईई मेन परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात चार टप्प्यांत होणार आहेत. गेल्या वर्षी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एनटीएने सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म विद्यार्थ्यांकडून भरून घेतला होता. हा फॉर्म यंदाही भरून घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना हा अर्ज संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा लागेल आणि परीक्षा केंद्रात सोबत आणावा लागेल. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला रजिस्टर क्रमांक, अन्य माहितीच्या आधारे लॉगइन करावे लागेल. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्यासंबंधीची अद्ययावत माहिती विचारण्यात येईल. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी - - नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जावे. - होमपेजवरील अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक करावे. - विचारलेली माहिती भरावी. - सबमिट करावे. - आता अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल. - अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे, प्रिंटआऊट घ्यावे आणि त्यावरील संपूर्ण माहिती, सूचना नीट वाचाव्या. अॅडमिट कार्डमध्ये काही चूक आढळली तर तत्काळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी संपर्स साधावा. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना जेईई मेनचा ड्रेस कोड फॉलो करावा लागेल. यासंबंधीची माहिती अॅडमिट कार्डवर असेल. जेईई मेन अॅडमिट कार्डाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना एक वैध ओळखपत्रदेखील परीक्षेला येताना सोबत बाळगावे लागेल. विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक हँड सॅनिटायझर, पारदर्शक पाण्याची बाटली सोबत बाळगण्यास परवानगी आहे. मधुमेह असणारे विद्यार्थी सोबत खाणंही आणू शकतात, मात्र त्यासाठी परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल. हेही वाचा: जेईई मेन २०२१ साठी पेपर पॅटर्नJEE Main 2021 चा सिलॅबस मागील वर्षीप्रमाणेच असेल. विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजीमधील प्रत्येकी २५ प्रश्न सोडवायचे असतील.विचारण्यात आलेल्या प्रश्नांची एकूण संख्या ९० असेल. या ९० पैकी ७५ प्रश्नच विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jpyrP2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments