Also visit www.atgnews.com
रेल्वे भरती: RRB NTPC Phase 4 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
Admit Card 2021: रेल्वे भरती बोर्डाने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या चौथ्या टप्प्यात परीक्षेचे १५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२१ पर्यंत आयोजन केले आहे. या परीक्षेत सुमारे १५ लाख उमेदवार सहभागी होणार आहेत. उमेदवारांना केंद्रात वैध फोटो आयडी प्रूफ घेऊन जावा लागणार आहे आणि रिपोर्टिंग वेळेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रात पोहोचावे लागणार आहे. Phase 4 2021: असे डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड - सर्वात आधी आपल्या क्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर जा. - यानंतर अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्याच्या लिंक वर क्लिक करा. - आता आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख आदी माहिती भरा. - आता स्क्रीनवर हॉलतिकीट किंवा अॅडमिट कार्ड दिसेल. - अॅडमिट कार्ड डाउनलोड करून एक प्रिंटआउट घेऊन ठेवा. RRB NTPC परीक्षा ही नॉन- टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (NTPC) च्या उमेदवारांच्या निवडीसाठी आयोजित केली जाणारी पहिली परीक्षा आहे. यापरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेतील पुढील टप्प्यांना बोलावले जाईल. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारी घेऊन परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांना मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, ब्लू टूथ आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LOh2TQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments