Also visit www.atgnews.com
वायुदलात भरती; दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांना नोकरीची संधी
Indian Air Force Jobs: भारतीय वायुसेनेत ग्रुप सी च्या अनेक असैनिक पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांपर्यंत प्रत्येकासाठी (Vacancy 2021) नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्या पदांवर होणार भरती (Jobs), अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार ही सर्व माहिती या वृत्तात दिली आहे. ही भरती वायु सेनेच्या साउथ वेस्टर्न एयर कमांड हेडक्वार्टर अंतर्गत होणार आहे. अधिकृत नोटिफिकेशन आणि अर्ज पुढे देण्यात आले आहेत. या पदांवर होणार भरती - मल्टी-टास्किंग स्टाफ हाउस कीपिंग स्टाफ मेस स्टाफ एलडीसी क्लर्क हिन्दी टायपिस्ट स्टेनोग्राफर ग्रेड-2 स्टोर सुपरीटेंडेंट स्टोरकीपर लॉन्ड्रीमॅन आया / वार्ड सहायिका कुक फायरमन एकूण पदे - २५५ हेही वाचा: आवश्यक पात्रता पदांनुसार आवश्य शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. काही पदांसाठी किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण आहे, काही पदांसाठी बारावी उत्तीर्ण तर काही पदांसाठी उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा २५ वर्षे आहे. ओबीसी वर्गासाठी को कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची तर एससी, एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची आणि दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादेत १० वर्षांची सवलत देण्यात आली आहे. विभागीय कर्मचारी, विधवा, घटस्फोटित महिलांसाठी देखील कमाल वयोमर्यादेत सवलतीचा लाभ मिळणार आहे. कसा कराल अर्ज? भारतीय वायुसेनेच्या या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज नोटिफिकेशनसोबत देण्यात आला आहे. अर्ज संपूर्ण भरून पाकिटात भरून नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. पाकिटावर दहा रुपयांचा पोस्टल स्टॅम्प लावायचा आहे आणि कोणत्या पदासाठी कोणत्या प्रवर्गात अर्ज केला आहे, त्याची माहिती ठळकपणे नमूद करायची आहे. दिलेल्या पत्त्यावर १३ मार्च २०२१ पर्यंत तुमचा अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे. कशी होणार निवड? आधी अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केली जाईल. नंतर लेखी परीक्षा होईल. यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना पदांच्या आवश्यकतेनुसार स्कील टेस्ट / फिजकल टेस्ट / प्रॅक्टिकल टेस्ट द्यावी लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2MQfAAX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments