Also visit www.atgnews.com
केंद्र सरकारी नोकरभरती; UCIL मध्ये विविध पदे रिक्त
2021: केंद्र सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) ने वर्षातली पहिली भरती जाहिरात दिली आहे. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यूसीआयएलचे अधिकृत संकेतस्थळ ucil.gov.in ला भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज डाऊनलोड करू शकतात. हे अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत २० मार्च २०२१ पर्यंत आहे. सुपरवायझर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि अन्य अशा विविध ४७ पदांवर भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया उमेदवार यूसीआयएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जॉब सेक्शनमध्ये उपलब्ध केलेल्या भरतीच्या जाहिरातीवर क्लिक करून अधिसूचना आणि अर्जाचे प्रारुप डाऊनलोड करू शकतात. हा अर्ज संपूर्ण भरून, विचारलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रतींसह सोबत अर्ज शुल्काच्या (५०० रुपये) डिमांड ड्राफ्टसह अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. पदांचा तपशील डीजीएम / चीफ मॅनेजर – मेडिकल सर्व्हिसेस – ४ पदे चीफ सुप्रींटेंडेंट / अॅडिशनल सुप्रींटेंडेंट / डेप्युटी सुप्रींटेंडेंट – सिविल – ४ पदे चीफ मॅनेजर / मॅनेजर / अॅडिशनल मॅनेजर / डेप्युटी मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर - अकाउंट्स – ७ पदे कंट्रोलर ऑफ स्टोर्स / अॅडिशनल कंट्रोलर ऑफ स्टोर्स – १ पद चीफ सुप्रीटेंडंट / अॅडिशनल सुप्रीटेंडंट / असिस्टंट सुप्रीटेंडंट – माइंस – ११ पदे अॅडिशनल मॅजेनर / डेप्युटी मॅनेजर - पर्सोनेल – १ पद अॅडिशनल सुप्रींटेंडेंट / डेप्युटी सुप्रीटेंडंट – मिल – १ पद अॅडिशनल सुप्रींटेंडेंट / डेप्युटी सुप्रीटेंडंट – इंस्ट.– १ पद अॅडिशनल सुप्रींटेंडेंट / डेप्युटी सुप्रीटेंडंट – सर्वे– १ पद डेप्युटी मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर - सिक्युरिटी – ३ पदे डेप्युटी कंट्रोलर ऑफ पर्चेस / असिस्टंट कंट्रोलर ऑफ पर्चेस – १ पद असिस्टेंट मॅनेजर – सीएस / असिस्टंट मॅनेजर – पर्सोनेल – १ पद सुपरवाइजर केमिकल – ७ पदे सुपरवाइजर सिविल – २ पदे फोरमन मेकेनिकल – ३ पदे सेक. असिस्टंट – सी – २ पदे हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cJMHkc
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments