UPSC CAPF DAF 2020: परीक्षेसाठी जारी झाला DAF अर्ज

CAPF DAF 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी आपल्या अधिकृत वेबसाइटवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) परीक्षा २०२० च्या उमेदवारांसाठी विस्तृत अर्ज (DAF) जारी करण्यात आला आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते CAPF परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज २५ फेब्रुवारी २०२१ किंवा त्यापूर्वी सायंकाळी सहा वाजेपर्यंत UPSC CAPF परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. आयोगाने लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२१ रोजी आयोजित केली होती. परीक्षेचा निकाल ८ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. UPSC CAPF मध्ये सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव सुरक्षा बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये निवड होण्यासाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. भरती अभियान २०९ पदांवर भरती करण्यासाठी आयोजित केले जात आहे. यापैकी ७८ रिक्त पदे बीएसएफची, ६९ पदे सीआयएसएफची, २७ आयटीबीपीसाठी, २२ एसएसबीसाठी आणि १३ सीआरपीएफसाठी आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tXGuqY
via IFTTT

Post a Comment

0 Comments