Also visit www.atgnews.com
UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर; मिळणार आणखी एक संधी
UPSC Exam : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा (Civil Services Exam) देणाऱ्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकार सिव्हील सर्व्हिस परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्यास राजी झाले आहे. सरकारने यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. रचना सिंह नावाच्या उमेदवाराने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गेले अनेक दिवस सुनावणी सुरू आहे. या याचिकेत असं म्हटलं आहे की करोना महामारीमुळे २०२० या वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक उमेदवारांना सहभागी होता आले नाही. दुसरीकडे ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली त्यांना विपरित परिस्थितीमुळे आपलं संपूर्ण योगदान देता आलं नाही. याचिकेत मागणी केली आहे की या करोना महामारी स्थितीमुळे, ज्या उमेदवारांना २०२० मध्ये झालेली यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देता आली नाही, त्यांना आणखी एक संधी द्यावी. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. यूपीएससी सिव्हिल सेवा पूर्व परीक्षा २०२० चे आयोजन ४ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आले होते. याआधी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायलयाने केंद्र सरकारला सूचित केले होते की यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस सेवा परीक्षा २०२० मध्ये ज्या उमेदवारांचा हा अखेरचा अटेम्प्ट असेल त्यांना वयोमर्यादा वाढवून आणखी एक संधी दिली जावी. मात्र, असे करताना अनेक अडचणी येतील असे केंद्र सरकारचे म्हणणे होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q7shWt
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments