Also visit www.atgnews.com
शिक्षण आणि नोकरीतील मराठा आरक्षण: आता सुनावणी मिश्र पद्धतीने
वृत्तसंस्था, नवी दिल्ली शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी आठ मार्चपासून ऑनलाइन आणि समक्ष अशा मिश्र पद्धतीने घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. 'तोपर्यंत न्यायालयात समक्ष सुनावणीस सुरुवात झाल्यास या खटल्यात समक्ष युक्तिवाद करता येतील. त्याचबरोबर पक्षकारांना ऑनलाइन युक्तिवाद करण्याचीही मुभा असेल,' असे पाच सदस्यीय घटनापीठाचे प्रमुख न्या. अशोक भूषण यांनी सांगितले. गेल्या मार्चपासून या प्रकरणाची सुनावणी फक्त ऑनलाइन पद्धतीने होत आहे. घटनापीठात न्या. भूषण यांच्या व्यतिरिक्त एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता, एस. रवींद्र भट यांचाही समावेश आहे. मार्चमधील सुनावणीचे वेळापत्रकही घटनापीठाने या वेळी जाहीर केले. सर्व पक्षकारांच्या वकिलांना आपापले युक्तिवाद 'सॉफ्ट कॉपी'च्या रूपात आणि लेखी स्वरूपात न्यायालयात दाखल करावे लागणार आहेत. या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनावणी समक्ष पद्धतीनेच घ्यावी, असे म्हणणे राज्य सरकारने २० जानेवारीला न्यायालयात मांडले होते. या खटल्यात न्यायालयाने अॅटर्नी जनरलचीही मदत मागितली होती. गेल्या वर्षी नऊ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणातील याचिकांच्या एकत्रित सुनावणीदरम्यान कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली; परंतु खटल्याचा निकाल तातडीने लागावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. युक्तिवादांचे वेळापत्रक याचिकाकर्ते - ८ ते १० मार्च राज्य सरकार - ११ ते १४ मार्च हस्तक्षेप याचिकाकर्ते - १७ मार्च अॅटर्नी जनरल - १८ मार्च हेही वाचा: राज्याचा कायदा काय? - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी राज्य विधिमंडळाने मराठा समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असणारे विधेयक मंजूर केले. मुंबई उच्च न्यायालय काय म्हणते? - मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे मान्य. - तरीही १६ टक्के आरक्षण अमान्य - राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षणाचे प्रमाण १२ ते १३ टक्के असावे हेही वाचा: विरोध कोणत्या मुद्द्यावर? - 'एसईबीसी' कायद्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी खटल्यात घालून दिलेल्या ५० टक्के या आरक्षणाच्या कमाल मर्यादेचे उल्लंघन हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39YlTLz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments