मुंबई विद्यापीठाचा तृतीय वर्ष बीए सेमिस्टर ५ चा निकाल जाहीर

Third Year BA result 2021: जानेवारी २०२१ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या () हिवाळी सत्राच्या मानव्य शाखेच्या तृतीय वर्ष बीए सत्र ५ या परीक्षेचा निकाल विद्यापीठाने सोमवारी जाहीर केला. उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५१ टक्के आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एकूण १२ हजार ५३० विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १४ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार २७४ एवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर १३३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ७२८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ https://ift.tt/2eryysJ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ९२ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने तृतीय वर्ष बीए सत्र ५ बरोबर, तृतीय वर्ष बीए सत्र ५ (७ ग्रेड पॉईंट), एमए समाजशास्त्र सत्र ३, बीई इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सत्र ७ असे चार निकाल जाहीर केले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kya8yV
via IFTTT

Post a Comment

0 Comments