Also visit www.atgnews.com
कोल्हापूरातील लष्करभरती लांबणीवर; करोनामुळे निर्णय
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर ५ ते २५ मार्च दरम्यान होणारी पुढे ढकलण्यात आली आहे. आता १५ मार्चपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ क्रीडा संकुलात हा भरती मेळावा होणार होता. गोवा आणि महाराष्ट्राल्या तरुणांसाठी ५ मार्च ते २१ मार्चपर्यंत या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार होते. महाराष्ट्रातले सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातले तर गोव्यातले उत्तर आणि दक्षिण गोव्यातले उमेदवार या मेळाव्यासाठी येणार होते. मात्र स्थानिक करोना महामारी स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा भरती मेळावा पुढे ढकलला. १५ मार्चनंतर या मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल. इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्थानिक जिल्हा आणि राज्य प्रशासनाने हा वेळ घेतला असल्याचे यासंदर्भात जारी परिपत्रकात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांना https://ift.tt/166cffQ वर त्यांच्या शंका विचारण्याचे किंवा ०२३१-२६०५४९१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NQNg1x
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments