Also visit www.atgnews.com
एक लाख ७४ हजारांहून अधिक उमेदवारांनी केले नीट पीजीसाठी अर्ज
2021: पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या नॅशनल एलिजीबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET PG) परीक्षेला एक लाख ७४ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची ३० मार्च ही अखेरची मुदत होती. परीक्षेसाठी एकूण १,७४,८८६ अर्ज आले आहेत. नीट पीजी २०२१ परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (NBE) ने यासंदर्भातील परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. अॅप्लिकेशन विंडो २८ मार्च रोजी पुन्हा उघडली होती. १,०६३ विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज सबमीट करूनही शुल्क भरले नसल्याचे लक्षात आल्याने ही विंडो रिओपन करण्यात आली होती. नीट पीजी परीक्षेचे आयोजन १८ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. देशभरात विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. शासकीय, खासगी, स्वायत्त आणि केंद्रीय विद्यापीठांमधील मास्टर ऑफ सर्जरी (MS) आणि डॉक्टर ऑफ मेडिसीन (DM) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी काही चौकशी करायची असेल ते NBE शी ०११-४५५९३००० या क्रमांकावर किंवा natboard.edu.in या पोर्टलद्वारे संपर्क साधू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sB0aAb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments