विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी जम्मूत हॅप्पीनेस सेंटर

उच्च शिक्षणात विद्यार्थी दररोज अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. विशेषत: करोनासारख्या महामारीमुळे निर्माण झालेल्या नव्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयआयएम जम्मूने एका अनोख्या हॅप्पीनेस सेंटरची सुरुवात केली आहे. आयआयएम जम्मूच्या आनंदम् सेंटर फॉर हॅप्पीनेसचे उद्घाटन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. यांनी मंगळवारी केले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकर हेही यावेळी उपस्थित होते. या केंद्रासंदर्भात पोखरियाल म्हणाले, 'आजच्या वेगवान जगात आपण दररोज नव्या आव्हानांचा सामना करत आहोत. विशेषत: करोना महामारी काळात अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. विद्यार्थ्यांना अशा वेळी आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्यासाठी लोकांना संवेदनशील बनवणे आणि त्यांना मानसिक आरोग्याला शारीरिक आरोग्याइतकंच महत्त्व देण्यासाठी प्रोत्साहित करणे, खूप महत्त्वाचे आहे. अशात आयआयएम जम्मूने आनंदावर आधारिक हे केंद्र पूर्णपणए मानसिक कल्याणासाठी समर्पित केले आहे. हे खरंच एक वेगळं, अनोखं पाऊल आहे. हे केंद्र निश्चित पद्धतीने आपल्या स्थापनेमागचं उद्दिष्ट पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे.' जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी शिक्षणाला प्राधान्य देत केंद्र सरकारने विकासाचे अनेक कामे केली आहे. आतापर्यंत सफापोरा, कठुआ आणि पूँछ मध्ये चार नवी व्यावसायिक महाविद्यालये आणि जम्मूत एक नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u6EE6w
via IFTTT

Post a Comment

0 Comments