महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या PG अंतिम वर्ष परीक्षा पुन्हा लांबणीवर

वाढत्या करोना संसर्गामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या () उन्हाळी-२०२१ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा (Medical PG Final Year Exams 2021) पुन्हा ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा २५ मे पासून सुरू होणार होत्या, त्याऐवजी आता २४ जून पासून परीक्षा घेण्यात येतील. लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील. त्यासंदर्भातील निर्णय नंतर होणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले. करोना संसर्गग्रस्तांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे या परीक्षेला बसणारे शासकीय आणि स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयांमधील अनेक डॉक्टर्स कोविड ड्युटीवर आहेत. हे डॉक्टर ४५ दिवसांच्या स्टडी लिव्हवर होते. पण त्यांना पुन्हा ड्युटीवर बोलावण्यात आले. त्यामुळे या परीक्षा आता २४ जूनला सुरू होतील. परीक्षा मंडळाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. अजित पाठक म्हणाले, 'निवासी डॉक्टरांनी अभ्यासासाठी वेळ मागितला आहे. कारण त्यांच्यापैकी अनेक जण सध्या कोविड ड्युटीवर आहेत. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने विद्यापीठाला पत्र देत परीक्षा एका महिन्याहून अधिक काळासाठी पुढे ढकलण्याची मागणी केली होती.' दरम्यान, वाढत्या कोविड केसेसचा यूजी मेडिकल परीक्षांवर परिणाम झाला नाही. राज्यभरात १६५ परीक्षा केंद्रांवर झालेल्या परीक्षेत १०,९९५ विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती पाठक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. या परीक्षा सुरळीत पार पडल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rHZ8AN
via IFTTT

Post a Comment

0 Comments