Also visit www.atgnews.com
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने NET 2021 चा निकाल जाहीर केला आहे. TISS अॅडमिशन पोर्टल वर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी ही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा दिली आहे, जे TISS च्या वेबसाइटला भेट देऊन लॉगइन करून आपलं स्कोअरकार्ड मिळवू शकतात. त्यासाठी उमेदवारांना आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि अन्य माहिती भरावी लागेल. TISS NET परीक्षा पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाते. मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ सायन्स, बीएड, एमएड इंटिग्रेटेड या मास्टर्स अभ्यासक्रमांना या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. TISS NET ही संगणकीकृत परीक्षा होती. ही परीक्षा २० फेब्रुवारी २०२१ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. TISSNET Result 2021: कसा पहाल जाणून घ्या - - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट tiss.edu वर जा. - 'TISSNET Result 2021' लिंक वर क्लिक करा. - विचारलेली माहिती भरा. - निकाल आता कॉम्प्युटर स्क्रीन वर दिसेल. - निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tVnHvY
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments