Also visit www.atgnews.com
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षेला अर्धा तास अधिक वेळ
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा आता साडे तीन तासांची असणार आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. राज्यात करोना संक्रमणग्रस्तांची संख्या वाढत असल्याने या परीक्षा ऑनलाइन होणार का अशी चर्चा होती. त्याला वर्षा गायकवाड यांनी विराम दिला आहे. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत, मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vJPEZm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments