Also visit www.atgnews.com
ICAI CA Final, Foundation परीक्षांचा निकाल कधी? जाणून घ्या
ICAI CA Final, Foundation result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) सीए फायनल (CA Final) आणि सीए फाउंडेशन (CA Foundation) अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या निकालाची घोषणा करणार आहे. ओल्ड आणि न्यू कोर्स दोन्हीचे निकाल जारी होणार आहेत. या संबंधी आयसीएआयने परिपत्रक जारी केले आहे. या परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. संस्थेने सांगितले की चार्टर्ड अकाउंटंट फाइनल एग्जाम (ओल्ड आणि न्यू कोर्स) आणि फाउंडेशन परीक्षांच्या निकालाची घोषणा रविवारी २१ मार्च सायंकाळी किंवा सोमवारी २२ मार्च रोजी केली जाऊ शकेल. उमेदवार एकूण तीन अधिकृत वेबसाइट्स वर निकाल पाहू शकतात. CA result 2021: पुढील वेबसाइट्स वर पाहा निकाल - icaiexam.icai.orgcaresults.icai.org या वेबसाइट्स वर निकालाची लिंक अॅक्टिव झाल्यानंतर त्यावर क्लिक करा. नंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा पिन नंबर आणि रोल नंबर भरून सबमीट करा. ईमेलद्वारे देखिल मिळ शकतो निकाल तुम्ही तुमचा निकाल ई-मेल आयडी वर देखील मिळवू शकता. आयसीएआय ने सांगितले आहे की जो उमेदवार आपल्या ई-मेल आयडी वर निकाल मिळवू इच्छितात, त्यांनी icaiexa.icai.org या वेबसाइटवर रजिस्टर करावे. रजिस्ट्रेशन १९ मार्च २०२१ पासून सुरू झाले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eVbinm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments