एमबीए प्रवेश परीक्षा कधी? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पार पडणाऱ्या राज्यातील परीक्षेबाबत अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यंदा ही परीक्षा नेमकी कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. पदवी परीक्षांचे निकाल लांबल्यामुळे परीक्षेची तारीखही उशीरा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनामुळे पदवीचे प्रवेश गेल्या वर्षी उशिरा झाले. त्यामुळे पदवीचे निकाल सर्वच विद्यापीठांचे पुढे गेले. यामुळे आता राज्यात दरवर्षी मार्चमध्ये एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमबीए-एमएमएस सीईटीची अद्याप तारीख ठरलेली नाही. करोना प्रादुर्भावामुळे प्रवेश रखडले आहेत. याचाच परिणाम यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिसत आहे. मागील वर्षी एमबीएची प्रवेश परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी राज्यातील १४८ केंद्रावर घेण्यात आली होती. राज्यभरातून एक लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या सीईटीच्या माध्यमातून एमबीए अभ्यासक्रमांच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या कॉलेजांतील सुमारे ३७ हजार जागांवर प्रवेश पूर्ण केले जातात. गतवर्षी सीईटीनंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. करोनामुळे प्रवेश उशिरा झाले होते. यंदा पदवी परीक्षा अद्याप होणे बाकी आहे. तसेच सर्वच विद्यापीठात पदवी प्रवेश उशिरा झाल्याने परीक्षांची तयारी आता सुरू आहे. परीक्षेनंतर निकाल जाहीर होण्यास विलंब होणार असल्याने एमबीए प्रवेश सीईटीही पुढे ढकल्यात आली आहे. 'ऑनलाइन घ्यावी' पदवी प्रवेशाची अट असल्याने बहुसंख्य विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र ठरतात त्यामुळे हे निकाल जाहीर होण्याअगोदर प्रवेश परीक्षांचा तारीख जाहीर करणे उचित ठरणार नसल्याचेही सीईटी सेलच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पदवी परीक्षेला पात्र उमेदवारही ही परीक्षा देऊ शकतो. यामुळे प्रवेश परीक्षा कक्षाने तारीख जाहीर करावी व ऑनलाइन परीक्षा घ्यावी, असे मत काही विद्यार्थी नोंदवत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PDAR1B
via IFTTT

Post a Comment

0 Comments