CA फायनल, फाउंडेशन जानेवारी परीक्षेचा निकाल जाहीर

ICAI Result 2021: इन्स्टिट्यून ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटन्ट्स फायनल परीक्षा (जुना आणि नवा अभ्यासक्रम) आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर केला. ही परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. निकाल आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या वृत्तातही निकालाची थेट लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते पुढील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतील - caiexam.icai.orgcaresults.icai.org icai.nic.in ईमेलद्वारे देखिल मिळ शकतो निकाल तुम्ही तुमचा निकाल ई-मेल आयडी वर देखील मिळवू शकता. आयसीएआय ने सांगितले आहे की जो उमेदवार आपल्या ई-मेल आयडी वर निकाल मिळवू इच्छितात, त्यांनी icaiexa.icai.org या वेबसाइटवर रजिस्टर करावे. रजिस्ट्रेशन १९ मार्च २०२१ पासून सुरू झाले आहेत. 2021 कसा पाहाल? - ICAI च्या अधिकृत संकेतस्थळावर www.icai.org येथे जा - होमपेजवरील "Latest notification" सेक्शन पाहा. - “CA Result 2021” या लिंकवर क्लिक करा. - तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक, PIN क्रमांक आणि रोल नंबर आदि माहिती भरा. - सीए फायनल, फाउंडेशन निकाल आता स्क्रीनवर दिसेल. - निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sdlXxt
via IFTTT

Post a Comment

0 Comments