कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) साठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सामायिक विधी प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी आता ३० एप्रिल पर्यत अर्ज करू शकणार आहेत. अर्जांसाठी तब्बल एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार consortiumofnlus.ac.in या कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (CNLU) च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतो. परीक्षा १३ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या कालावधीत होणार आहे. कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांची मुदत ३० एप्रिल २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपत होती. परीक्षा ही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे किंवा जे २०२१ मध्ये परीक्षा देणार आहेत, असे विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांना बारावीत ४५ टक्के (आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के) गुण असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी LLM अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना LLB ला ४५ टक्के गुण असणे अनिवार्य आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3srTdRE
via IFTTT

Post a Comment

0 Comments