Also visit www.atgnews.com
JEE Main 2021: एप्रिल आणि मे सत्रासाठी नोंदणी सुरू
JEE Main 2021 जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच २०२१ परीक्षेच्या एप्रिल आणि मे सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एप्रिल मे २०२१ सेशनच्या रजिस्ट्रेशन संबंधी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार २५ मार्च २०२१ पासून ४ एप्रिल २०२१ (रात्री ११.५० वाजेपर्यंत) या कालावधीत मेन परीक्षांसाठी नोंदणी करता येणार आहे. मात्र दोन्ही सत्रांसाठी भरावयाचे शुल्क ५ एप्रिल २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंतच भरता येणार आहे. एनटीए द्वारे जेईई मेन एप्रिल आणि मे २०२१ परिपत्रकानुसार एप्रिल मध्ये केवळ पेपर १ चे आयोजन केले जाईल. ज्या उमेदवारांना बीई/बीटेक कोर्सेससाठी प्रवेश घ्यायचे आहेत, ते इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन पेपर १ मध्ये सहभागी होतील. एनटीए द्वारे जेईई मेन पेपर 2 ए (बी.आर्क) आणि 2 बी (प्लानिंग) चे आयोजन एप्रिल मध्ये केले जाणार नाही. या दोन्ही पेपर्सचे आयोजन मे दरम्यान केले जाईल. जेईई मेन 2ए या 2बी परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना जेईई मेन मे २०२१ साठी नोंदणी करावी लागेल. एप्रिलमध्ये २७ ते २० पर्यंत तर मे मध्ये २४ ते २८ मे पर्यंत होणार परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजेंसीने एप्रिल आणि मे सत्राच्या जेईई मेन परीक्षांच्या तारखांची देखील घोषणा केली आहे. एनटीएच्या परिपत्रकानुसार एप्रिल सत्राची जेईई मेन परीक्षा २७, २८, २९ आणि ३० एप्रिल २०२१ रोजी आयोजित केली जाईल. मे सत्राची परीक्षा २४, २५, २६, २७ आणि २८ मे २०२१ रोजी आयोजित केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39hnRWq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments