Also visit www.atgnews.com
GATE 2021: आन्सर की वरील हरकतींसाठी विंडो खुली; निकाल कधी जाणून घ्या
GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग () च्या आन्सर की वर हरकती घेण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. ज्या उमेदवारांना या उत्तरतालिकेतील एखाद्या उत्तराबाबत आक्षेप असेल ते अधिकृत वेबसाइटद्वारे आपला आक्षेप नोंदवू शकतात. gate.iitb.ac.in वर जाऊन उमेदवारांनी हरकतींसाठी केलेल्या लिंकवर जाऊन आपला आक्षेप नोंदवावा. गेट २०२१ ची आन्सर की २६ फेब्रुवारी रोजी आयआयटी मुंबईने जारी केली होती. उमेदावारांनी तपशीलवार पुराव्यासह ४ मार्च पर्यंत आन्सर कीवर हरकत नोंदवता येईल. हरकत घेण्यासाठी उमेदवारांना प्रति आक्षेप ५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. यानंतर गेट परीक्षेची अंतिम उत्तर तालिका १८ मार्च रोजी जारी केली जाईल. निकाल २२ मार्च रोजी जारी केला जाईल. ही प्रवेश परीक्षा ६, ७, १३ आणि १४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. GATE Answer Key: पुढील प्रकारे नोंदवता येईल आक्षेप - - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जा. - यानंतर ‘Contest Answer Key' या पर्यायावर क्लिक करा. - ऑनलाइन मोड वर प्रत्येक आक्षेपासाठी ५०० रुपये प्रमाणे शुल्क भरा. - प्रश्नाचा क्रमांक टाका. - कमाल ५०० शब्दांत तुमचा आक्षेप जस्टिफाय करा. - आवश्यक सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करा. - सर्व माहिती सबमिट करा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3raavlQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments