JEE Main 2021 मार्च सत्रापासून परीक्षा केंद्रांमध्ये वाढ

JEE Main 2021: संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य २०२१ () च्या पुढील तीन सत्रांसाठी परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढील परीक्षा आणखी तीन परीक्षा केंद्रांमध्ये आयोजित केल्या जातील. या परीक्षा केंद्रांपैकी एक भारतात आणि दोन परदेशात आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी () ने ३ मार्च रोजी सांगितले होते की, तीन नवी परीक्षा केंद्रे कारगिल, लडाख, क्वालालंपुर, मलेशिया आणि नायजेरिया मध्ये अबुजा / लागोस येथे असतील. एनटीएने सांगितले की विविध उमेदवारांनी मागणी केल्याने आणि कोविड-१९ महामारी मुळे उमेदवारांना येणाऱ्या समस्या ध्यानात घेऊन परीक्षा केंद्रांमध्ये वाढ केली आहे. मार्च पासून जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी ही तीन्ही परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत. दरम्यान, जेईई मेन २०२१ मार्च सत्रासाठी अर्ज करण्यासाठी विंडो उघडण्यात आली आहे. जेईई मेन मार्च 2021 (JEE Main March 2021) सत्रासाठीचे अर्ज जारी केले आहेत. जेईई मेन 2021 मार्च सत्रासाठीचे अर्ज jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. मार्चच्या सत्रासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च आहे. जेईई मेन मार्चसाठी अर्ज शुल्क ६५० रुपये आहे तर महिला / अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडीसाठी ३२५ रुपये आहे. परीक्षा कधी? जेईई मुख्य मार्च सत्राची परीक्षा १५, १६, १७ आणि १८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bW4UsS
via IFTTT

Post a Comment

0 Comments