Also visit www.atgnews.com
JEE Main March Exam 2021: जेईई मेन मार्च परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
JEE Main 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मार्च २०२१ परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा चार वेळा होणार आहे. फेब्रुवारी सत्राची परीक्षा झाली असून आता मार्च सत्राची परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यांनी या संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. जेईई मेन मार्च २०२१ परीक्षेच्या अॅडमिट कार्डची थेट लिंक देखील या वृत्तात पुढे देण्यात येत आहे. JEE Main Admit Card पुढील पद्धतीने डाऊनलोड करावे... १) सर्वात आधी jeemain.nta.nic.in या जेईईच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. २) होमपेजवरील अॅडमिट कार्ड नोटिफिकेशनच्या पर्यायावर क्लिक करावे. ३) आता तुम्ही लॉगइन पेजवर जाल. ४) तुमचा अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख, सिक्युरिटी पिन आदी माहिती भरून सबमीट करा. ५) आता तुमच्या स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसू लागेल. ६) अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा. जेईई मार्च २०२१ परीक्षेच्या तारखा JEE Main March Exam Dates 2021 जेईई मेन २०२१ मार्च प्रवेश परीक्षा १५ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. कोविड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या किमान तीन तास आधी पोहोचावे असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कळवले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38vqNhF
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments