Also visit www.atgnews.com
JEE Main Paper 2 Result: महाराष्ट्राच्या आदित्य जाधवला १०० पर्सेंटाईल
JEE Main Paper 2 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम मेन (JEE Main 2021) फेब्रुवारी सत्राच्या पेपर २ चा निकाल जाहीर केला आहे. पेपर २ म्हणजेच बी आर्क आणि बी प्लानिंग () पेपरमध्ये देशभरात केवळ दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. यात महाराष्ट्राचा आदित्य सुनील जाधव आणि तेलंगणचा जोस्युला वेंकट आदित्य यांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षआ दिली होती ते आपला निकाल jeemain.nta.in या संकेतस्थळावर पाहू शकतील. जोस्युला वेंकट आदित्य आणि आदित्य जाधव यांना अनुक्रमे BArch आणि BPlanning मध्ये १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये दिल्लीच्या मेघना गुप्ता या विद्यार्थिनीने पेपर 2A म्हणजेच BArch मध्ये ९९.९९ पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. आंध्र प्रदेशचा बंडारू रमा साहित्या याने 2B म्हणजेच BPlanning मध्ये ९९.९८ पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. दोन्ही पेपरमध्ये मिळून एकूण १८ विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाइल मिळाले आहे. जेईई मेन पेपर २ च्या मे सत्रानंतर विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरून अंतिम रँक जाहीर केले जाणार आहेत. 2021: १०० पर्सेंटाइल मिळवणारे विद्यार्थी - जोस्युला वेंकट आदित्य (BArch) - तेलंगण जाधव आदित्य सुनील (BPlanning) - महाराष्ट्र JEE Main Paper 2 Toppers 2021: टॉप पाच विद्यार्थिनी आणि त्यांचे पर्सेंटाइल गुण मेघना गुप्ता (BArch) - ९९.९९ सिया पंत (BArch) - ९९.९८ बंडारु रमा साहित्य (BPlanning) - ९९.९८ कोपल जैन (BPlanning) - ९९.९७ जामी रवीना (BArch) - ९९.९७ JEE Main Paper 2 Toppers 2021: टॉप ५ विद्यार्थी आणि त्यांचे पर्सेंटाइल गुण जोस्युला वेंकट आदित्य (BArch) -- १०० जाधव आदित्य सुनील (BPlanning) -- १०० जिनम भावेश केनिया (BArch) -- ९९.९९ मनश्वी कपूर (BArch) -- ९९.९९ उपाला विवेक नारायण (BArch) -- ९९.९९ JEE Main BArch, BPlanning Result: असा करा डाऊनलोड - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा. - यानंतर निकालासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. - आता नवी विंडो उघडेल. - तेथे जेईई मेन अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख भरा. - आता सर्व माहिती सबमिट करा. - निकाल तुमच्या स्क्रीन वर उघडेल. तुम्ही निकाल डाऊनलोड देखील करू शकता. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घेऊन ठेवा. यावर्षी जेईई मेन चार सत्रात आयोजित केली जाणार आहे. मात्र बीआर्क आणि बीप्लानिंग परीक्षा फेब्रुवारी आणि मे अशा दोन सत्रात आयोजित केली जाईल. एनटीएच्या वेळापत्रकानुसार, मे सत्रासाठी अर्ज करण्याची विंडो ३ मे पासून सक्रीय होईल आणि १२ मे पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30Uyvhl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments