NATA 2021: बी. आर्क प्रवेश परीक्षेसाठी पात्रता निकष शिथील

नवी दिल्ली येथील काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने म्हणजेच नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) परीक्षेच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. आता १ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. यासोबतच काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने नाटा परीक्षेच्या पात्रता नियमांमध्येही बदल केला आहे. पात्रतेचे नियम काऊन्सिलने शिथील केले आहेत. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी पात्रतेचे निकष शिथील करण्यात आले आहेत. नव्या निकषांनुसार, उमेदवारांनी बी आर्क कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आर्किटेक्चरमधील अॅप्टिट्यूट टेस्ट क्वालीफाय करावी लागेल. मात्र कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी शैक्षणिक योग्यतेसंदर्भात सुधारित निकष जारी करत पाच वर्षे कालावधीच्या बी आर्क कोर्सच्या प्रथम वर्षातील प्रवेशासाठी पात्रतेत सवलत दिली आहे. मात्र, उमेदवारांना बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा दहावी अधिक तीन वर्षांचा डिप्लोमा गणित या अनिवार्य विषयासह अनुत्तीर्ण असणे आवश्यक आहे.' NATA देशातील प्रतिष्ठित आर्किटेक्चर शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी होणारी पात्रता परीक्षा आहे. अर्थात, आर्किटेक्चर शिक्षण संस्थांमध्ये जेईई म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षेद्वारे देखील प्रवेश दिला जातो. पण नाटाची स्वत:ची स्वतंत्र प्रवेश परीक्षा देखील असते. नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर, वास्तुकलेच्या क्षेत्रात इंजीनियरिंग करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी देशातील प्रतिष्ठित आर्किटेक्चर शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्याची संधी देते. नव्या नियमांसंदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास उमेदवार नाटा हेल्पडेस्क नंबर ९५६०७०७७६४, ९३१३२७५५५७ आणि nata.helpdesk2021@gmail.com वर ई-मेल करून विस्तृत माहिती घेऊ शकतात. या वृत्तात नाटा परीक्षेतील पात्रतेच्या निकषांतील बदलांविषयीची विस्तृत माहिती, अर्ज करण्याची थेट लिंक आणि अधिकृत अधिसूचनेची लिंक देण्यात येत आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39v6rWB
via IFTTT

Post a Comment

0 Comments