NEET 2021 ची तारीख जाहीर; ऑगस्टमध्ये होणार परीक्षा

NEET Date Update: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट २०२१ () परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, NEET (UG) परीक्षा रविवार, १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. इंग्रजी आणि हिंदीसह ११ भाषांमध्ये पेन-पेपर पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. उमेदवार नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज ntaneet.nic.in या एनटीएच्या संकेतस्थळामार्फत करायचे आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट यूजी परीक्षा घेतली जाते. एका उमेदवाराने एकच अर्ज करावयाचा आहे. एनटीएने नीट परीक्षेसंबंधीची माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी आपली पासपोर्ट आकाराची छायाचित्रं आणि पांढऱ्या पार्श्वभूमीवरची ४ बाय ६ पोस्ट कार्ड साइडची रंगीत छायाचित्रं देखील काढून ठेवावीत. ही छायाचित्र ऑनलाइन अर्जात तसेच समुपदेशनाच्या वेळी आवश्यक असतील. जे उमेदवार नीट यूजी २०२१ परीक्षा देणार आहेत, त्यांनी पुढील संकेतस्थळांना नियमितपणे अद्ययावत माहितीसाठी भेट द्यावी -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cn7iJo
via IFTTT

Post a Comment

0 Comments