Also visit www.atgnews.com
SSC HSC Exam: बुरखा, स्कार्फ घालून परीक्षा देण्याची परवानगी देण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मुस्लिम परीक्षार्थी विद्यार्थिनींना बुरखा, स्कार्फ घालून परीक्षा देण्याची परवानगी द्या, दहावी, बारावी परीक्षेदरम्यान रमजान सण येत आहे, त्यामुळे दुपारचे पेपरचे सत्र बदलावे अशी मागणी हॅपी टू हेल्प फाउंडेशन संघटनेने केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांची गुरुवारी भेट घेतली. परीक्षेच्या अनुषंगाने संघटनेने विविध मागण्या मांडल्या. चर्चेनंतर निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या परीक्षेत मुस्लिम परीक्षार्थी विद्यार्थिनींना बुरखा, स्कार्फ घालून परीक्षा देण्याची परवानगी द्यावी, परीक्षा हॉल व परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिला पोलिस अधिकारी, शिक्षकांतर्फे सर्व पडताडणी करण्यात यावी. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. या महिन्यात रमजान येत आहे. परीक्षेचे काही पेपर हे दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. सदर पेपरच्या वेळेस शिक्षक; तसेच विद्यार्थ्यांना उपास सोडण्याची वेळ असल्याने या वेळेत बदल करण्यात यावे. निवेदन राज्य मंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल व मार्गदर्शन घेण्यात येईल असे आश्वासन सचिवांनी दिल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शफीक पठाण, सय्यद अब्दुल रहीम, शेख यासेर , डॉ. सोहेल नवाब, सय्यद ताजीम, मोहसीन खान आदींची उपस्थिती होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QuVddN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments