Also visit www.atgnews.com
SSC JE परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जारी
2019 Answer Key: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ज्युनिअर इंजिनीअर पेपर १ परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जारी केली आहे. ऑक्टोबर आणि डिसेंबर २०२० मध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. SSC JE पेपर १ परीक्षेचा निकाल १ मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. एकूण ५,६८१ उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले. हे सर्व उमेदवार आता पेपर २ देण्यास पात्र आहेत. ही परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. आयोगाने परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जारी केली आहे. उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून आन्सर की डाऊनलोड करू शकतात. ही उत्तरतालिका प्रश्नपत्रिकेसह २८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेबसाइटवर उपलब्ध राहील. पेपर २ साठी एसएससीने कळवलं आहे की परीक्षेच्या शहराबाबतची माहिती आणि योग्य उमेदवारांच्या प्रवेश प्रमाणपत्रासंबंधीची माहिती प्रादेशिक कार्यालयांच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल. जे उमेदवार आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यास असमर्थ असतील ते संबंधित क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधू शकतात. SSC JE 2019 पेपर १ परीक्षा सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वालिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स पदांवर निवडीसाठी ऑनलाइन आयोजित केली गेली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t6oVDQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments