UPSC NDA NA 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

NDA result 2020: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी (NA) परीक्षा 2020 च्या निकालांची घोषणा केली आहे. यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in पर अंतिम निकाल जारी करण्यात आला आहे. ही लेखी परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी यूपीएससीने आयोजित केली होती. यानंतर सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) द्वारे इंटरव्यू घेण्यात आले होते. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे गुण एकत्रित करून एकूण ५३३ उमेदवारांची अंतिम यादी यूपीएससीने जाहीर केली आहे. ५३३ उमेदवार यशस्वी झाले आहे. मेडिकल चाचणीच्या निकालाला यात जोडलेले नाही. ने सांगितले की निकाल तूर्त प्रोव्हिजनल आहे. यशस्वी उमेदवारांची निवड आवश्यक कागदपत्रांच्या सत्यपडताळणीनंतर अंतिम समजली जाईल. संपूर्ण मेरिट लिस्ट (UPSC NDA merit list) पुढे दिलेल्या निकालाच्या लिंक द्वारे पाहता येईल. यूपीएससीद्वारे असे स्पष्ट करण्यात आले आहे की उमेदवारांच्या गुणनिहाय निकालाची घोषणा निकालाच्या तारखेनंतर (६ मार्च २०२१) १५ दिवसांनी अधिकृत वेबसाइट वर केली जाईल. या परीक्षेद्वारे भारतीय सैन्यदल (Indian Army), वायूदल (Air Force) आणि नौदलात (Indian Navy) भरती केली जाते. दलात दाखल होण्यापूर्वी इंडियन मिलिट्री अकॅडमी (IMA) आणि इंडियन नेवल एकेडमी (INA) मध्ये प्रशिक्षण दिले जाते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ee4EIt
via IFTTT

Post a Comment

0 Comments