आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर

ICSE 10th 12th exam 2021 postponed: सीबीएसई (CBSE) आणि अनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनंतर आता आयसीएसई बोर्डाने देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. काउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन () ने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. बोर्डाने या परिपत्रकात काय म्हटले आहे जाणून घ्या... आयसीएसई बोर्डाने सांगितले आहे की कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी (ISCE Exam 2021) आणि बारावी (ISC Exam 2021) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात करोना महामारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळाले पर्याय आयसीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले जाणार आहेत. आयसीएसई दहावीचे विद्यार्थी एकतर बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत ऑफलाइन परीक्षा देऊ शकतात किंवा मग परीक्षा न देण्याचा पर्याय निवडू शकतात. बोर्डाने असे म्हटले आहे की जे विद्यार्थी परीक्षा न देण्याचा पर्याय निवडतील त्यांचा निकाल तयार करण्यासाठी नि:पक्ष आणि योग्य मापदंड लावले जातील. आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार होत्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QzD1ju
via IFTTT

Post a Comment

0 Comments