Also visit www.atgnews.com
चाचणी ४८ तासांसाठीच वैध; दर दोन दिवसाआड चाचणीचा शिक्षकांवर तणाव
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावी व बारावीच्या अनुक्रमे २३ व २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. ही चाचणी ४८ तासांसाठीच वैध राहणार आहे. त्यामुळे दर दोन दिवसांनी शिक्षकांना करोना चाचणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. चाचणीच्या अहवालासाठी एक दिवस लागत असल्याने पर्यवेक्षकांना परीक्षेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे परीक्षेसाठी पर्यवेक्षकांचे नियोजन करणे शाळांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी शिक्षकांना दर दोन दिवसांनी रुग्णालयामध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे वारंवार रुग्णालयात गेल्याने करोना रुग्णांच्या संपर्कात येऊन लागण होण्याची शक्यता काही शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच चाचणीचा अहवाल येण्यास एक दिवस लागत असल्याने शिक्षकांना त्या दिवशी परीक्षा केंद्रावर हजर राहता येणार नाही. ज्या दिवशी शिक्षकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने पर्यायी शिक्षक उपलब्ध करण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत नसल्यामुळे वारंवार आमची चाचणी करण्यात येईल का? याबाबत शिक्षकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे यामुळे शिक्षकांचे लसीकरण करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे, मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी केली आहे. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rSNjrN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments