Also visit www.atgnews.com
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला पालकांचा नकार
म. टा. प्रतिनिधी, पुणे सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील बारावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कॉलेजमध्ये बोलविण्याच्या निर्णयाला पालकांनीही कडाडून विरोध केला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचेही दहावीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापन करावे, अशी मागणी पालकांकडून केली जात असून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. सीबीएसई बोर्डाच्या पुणे विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण अपलोड करायला सांगितले आहे. ज्या कॉलेजने यापूर्वी या परीक्षा घेतल्या नसतील, त्यांनी त्या २८ एप्रिलपूर्वी घ्याव्यात आणि मूल्यांकन वेबसाइटवर अपलोड करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी या परीक्षा आधीच घेतल्या असल्या, तरी अनेक महाविद्यालयांच्या या परीक्षा घेणे राहिले असून त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावण्याचे प्रकार घडत आहेत. याला पालक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी कडाडून विरोध केला असून काहीही झाले, तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पाठवणार नाही, असे पालकांकडून ठामपणे सांगण्यात आले आहे. यामुळे सीबीएसई बोर्डाच्या पुणे विभागाला यावर पर्याय शोधून काढणे आवश्यक आहे. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर या परीक्षा घ्याव्यात किंवा बारावीच्या लेखी परीक्षेनंतर या परीक्षा घ्याव्यात, या मागणीने जोर धरला आहे. सीबीएसई बोर्डाकडून लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये न बोलावता पर्यायी मार्गांचा विचार केला जाऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतीत पुणे विभागाने घेतलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे निवेदन पत्राद्वारे केले आहे. त्यावर अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही. आम्ही तसे होऊ देणार नाही. - कल्पेश यादव, अध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gMwNb0
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments