Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाचा पेट परीक्षेचा निकाल जाहीर
Result: मुंबई विद्यापीठाने () पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी घेतलेल्या ऑनलाईन पेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ज्या लिंकवरून परीक्षा दिली होती त्याच लिंकवर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक, युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा निकाल पाहता येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाने दिनांक २५,२६ आणि २७ मार्च २०२१ या तीन दिवसांत विविध विषयांसाठी पेट परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले होते. यामध्ये पीएचडीसाठी एकूण ७ हजार ७०६ एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ४ हजार ३०४ एवढे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर एमफील परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या २२३ विद्यार्थ्यांपैकी १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पीएचडी निकालाच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५५.८५ एवढी असून एमफील परीक्षेची टक्केवारी ४७.५३ एवढी आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3slpqta
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments