मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी 'हेल्पलाइन' होणार सुरू

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोनानंतरच्या आयुष्याला विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धैर्याने सामोरे जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन व कर्मचारी-प्राध्यापक यांच्यासाठी कार्य गट स्थापन करणार आहे. कोविड संकटात शैक्षणिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. विद्यापीठात मानसशास्त्र विभागाच्या वतीने 'कोविड-१९ नंतरचे जीवन' या विषयावर शुक्रवारी ऑनलाइन व्यााख्यान घेण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी उपक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक सहभागी झाले. 'कोविडनंतरच्या परिस्थिती संदर्भात विविध उपाय करीत आहोत. प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित समस्या सोडविणे व समुपदेशन करण्यासाठी दोन कार्य गट स्थापन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद उपपरिसर संचालक डॉ. डी. के. गायकवाड प्राध्यापकांच्या गटाचे प्रमुख आहेत. बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर हे कर्मचारी-अधिकारी कार्यगटाचे प्रमुख असतील. आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न गट करील', असे कुलगुरू येवले म्हणाले. मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे या विद्यार्थी 'हेल्पलाईन'च्या प्रमुख आहेत. विद्यापीठ प्रशासन कोविडनंतरच्या उपाययोजनांसाठी प्रयत्न करीत आहे. दरम्यान, डॉ. संदीप शिसोदे यांनी 'मी, माझे विचार आणि कोविड-१९' या व्याख्यानात विचार मांडले. सकारात्मक विचार व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर संकटाला सामोरे जाता येते. माणसाला वर्तन नियंत्रण ठेवता येते पण मन, विचारावर नियंत्रण मिळवणे अवघड जात आहे. मनातील विचार जवळच्या व्यक्तीसोबत बोला. भीतीदायक, नकारात्मक विचार ओळखा व नकारात्मक विचारांपासून स्व-संरक्षण करणारे विचार वापरा, असे शिसोदे म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vq2bQC
via IFTTT

Post a Comment

0 Comments