पुणे विद्यापीठ अभ्यासणार कोविड विषाणूचे नमुने

म. टा. प्रतिनिधी, पुणे (आरटी-पीसीआर) करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर मॉलिक्युलर डायग्नोस्टिक अँड रिसर्च ही प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या या नव्या प्रयोगशाळेमुळे करोना चाचण्यांचा अहवाल लवकर मिळण्यास मदत होणार आहे. या सेंटरमध्ये काम करण्यासाठी 'बीएसएल २' प्रयोगशाळेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या संशोधक आणि तंत्रज्ञ व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांवर संशोधन करण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात यावी, यासाठी वर्षभरापासून पुणे विद्यापीठाची तयारी सुरू होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून करोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळा उभारण्याच्या सूचना अकृषी विद्यापीठांना देण्यात आल्या. त्यानुसार पुणे विद्यापीठाने प्रयोगशाळेबाबत आवश्यक त्या सर्व मान्यता यशस्वीपणे मिळवल्या. आता केवळ कागदोपत्री आदेशाची प्रतीक्षा आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची पाहणी करून, त्याला मान्यता देण्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चकडून (आयसीएमआर) लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले होते. याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, 'पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर मॉलिक्युलर डायग्नोस्टिक अँड रिसर्च या प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले आहे. 'एएफएमसी'चे ब्रिगेडियर सौरव सेन यांनी प्रयोगशाळेची पाहणी व तपासणी केली आहे. त्यानुसार 'एएफएमसी'कडून प्रयोगशाळेत करोना विषाणूचे सॅम्पल टेस्टिंग करण्याच्या दृष्टीने संमती दिली आहे. येत्या काही दिवसांत 'आयसीएमआर'कडून प्रयोगशाळेस कागदोपत्री मान्यता मिळेल. त्यानुसार येत्या सोमवारी किंवा मंगळवारपासून प्रयोगशाळा सुरू होईल. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार दर दिवशी करोना विषाणूंचे नमुने तपासले जातील.' तज्ज्ञ, संशोधक, तंत्रज्ञांचे सहकार्य आवश्यक 'पुणे विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत 'बीएसएल २'सारख्या प्रयोगशाळेत मॉलिक्युलर बायोलॉजी टेक्निक्स, डेटा हँडलिंग अशा कामांचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींनी विद्यापीठाला सहकार्य करावे. , संशोधन संस्था आणि संलग्न महाविद्यालयांत कार्यरत असणाऱ्या संशोधक आणि प्राध्यापकांनी पुढे येऊन 'सॅम्पल टेस्टिंग'च्या कामात सहभागी व्हावे,' असे आवाहन डॉ. करमळकर यांनी केले आहे. या कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यापीठाने वेबसाइटवर गुगल फॉर्म उपलब्ध केला असून, तो भरण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Sdp1fP
via IFTTT

Post a Comment

0 Comments