Also visit www.atgnews.com
CLAT 2021: परीक्षा अर्जांसाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ
Exam: कॉमन लॉ एडमिशन टेस्ट (, CLAT 2021) परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची मुदत वाढवण्यात आली आहे. यानुसार आता उमेदवार १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत क्लॅट परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही, ते अधिकृत संकेतस्थळ https://ift.tt/2Qkp6cX वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र, कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिवर्सिटीज (CNLU) द्वारे CLAT 2021 परीक्षेची तारीख पुन्हा निश्चित करण्याबाबत कोणतेही अपडेट केलेले नाही. क्लॅट परीक्षा देऊ इच्छिणआऱ्या उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की अखेरच्या टप्प्यात अर्ज करण्यासाठी वेबसाइटवर लोड वाढू शकतो, त्यामुळे अर्ज करताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वेळ राखूनच अर्ज करावा. अधिकृत पोर्टलवरील अपडेटनुसार, क्लॅट परीक्षा १३ जून २०२१ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या सत्रात आयोजित केली जाणार आहे. परीक्षेची १३ जून ही तारीख नियोजित आहे, मात्र करोनामुळे बारावीच्या बोर्ड परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत, त्या नेमक्या याच काळात सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत कंसोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष फैझान मुस्तफा म्हणाले की बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्याआधी १३ जून रोजी नियोजित वेळेत ही परीक्षा होईल, अशी आम्ही आशा करत आहोत. दरम्यान, मे महिन्यात, परीक्षेच्या अंतिम तारखेवर शिक्कामोर्तब होण्याआधी, कोविड-१९ च्या ताज्या स्थितीचा आढावा घेण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nw9ovz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments