Also visit www.atgnews.com
ICSI CSEET May Exam: विद्यार्थ्यांना दिलासा; मिळाला ऑप्ट आऊटचा पर्याय
CSEET : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) मार्फत येत्या ८ मे रोजी कंपनी सेक्रेटरीज एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्ट किंवा CSEET परीक्षेचे आयोजन करणार आहे. ही परीक्षा रिमोट प्रोक्टड मोड वर होणार आहे. छात्र जो कोविड-१९ कंटेन्मेंट झोनमध्ये राहत आहेत आणि ते टेस्टसाठी लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा वेबकॅम आणि अन्य आवश्यक साधनांची व्यवस्था करू शकले नाहीत, तर ते ऑप्ट आउटचा पर्याय निवडू शकतात आणि आपली उमेदवारी जुलै २०२१ सत्रासाठी पुढे वाढवू शकतात. ICSI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोविड-१९ महामारीमुळे देशात आलेल्या आरोग्यविषयक संकटाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने CSEET चे आयोजन ८ मे २०२१ रोजी परीक्षा केंद्रांऐवजी रिमोट प्रोक्टड मोडवर घेण्याचा निर्णय घेतला आहे.' निवेदनात पुढे असं म्हटलं आहे की, 'उमेदवार आपला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या माध्यमातून ICSI CSEET मे २०२१ परीक्षा आपल्या घरून किंवा सुविधा असलेल्या अन्य ठिकाणाहून देऊ शकतात.' ICSI CSEET ऑप्ट आउटची सुविधा पुढील परिस्थितीत उमेदवार मे सत्र परीक्षेसाठी ऑप्ट आउट पर्याय निवडू शकतील - - डेस्कटॉप, लॅपटॉप, डेस्कटॉप मध्ये वेबकॅमची उपलब्धता नसणे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे किंवा इंटरनेट संबंधी सुविधा नसल्याने उमेदवार मे परीक्षेसाठी ऑप्ट आउटचा पर्याय निवडू शकतात. - कोविड-१९ कंटेनमेंट झोन किंवा रेड झोन मध्ये राहणारे उमेदवार, जे सायबर कॅफेपर्यंत जाऊ शकत नाहीत. - असे उमेदवार जे आपल्या घरापासून दूर दुसऱ्या कुठल्या जागी अडकले आहेत आणि त्यांच्याकडे परीक्षा देण्याची कोणतीही सोय नाही. MAY 2021 CSEET परीक्षेसाठी ऑप्ट-आउटचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी ३ मे पर्यंत विहित नमुन्यातील एक घोषणापत्र सबमीट करावे लागेल. घोषणा पत्र प्राप्त झाल्यावर, उमेदवारांची नोंदणी CSEET च्या मे 2021 सत्रासाठी रद्द केली जाईल आणि CSEET च्या जुलै 2021 सत्रात ट्रान्सफर केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dZDWTj
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments