Also visit www.atgnews.com
JEE Main April 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच
JEE Main April 2021 Admit Card Date: संयुक्त प्रवेश परीक्षा () म्हणजेच जेईई मेनचे तिसरे सत्र २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे लवकरच जेईई मेन एप्रिल सत्र परीक्षेचे अॅडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जारी करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपले अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डसह लॉग इन करावे. एप्रिल सत्रादरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सी केवळ अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी बीई / बीटेक पेपरचे आयोजन करेल. अलिकडेच ने जेईई मेन अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत ७ एप्रिलपर्यंत वाढवली होती. JEE Main 2021 Admit Card: अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर पुढील पद्धतीने डाउनलोड करा - - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा. - आता अॅडमिट कार्डसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. - आता लॉग इन विंडो वर आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका. - आता सर्व माहिती सबमिट करा. - अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घेऊन ठेवा. एप्रिल सत्राची परीक्षा झाल्यानंतर जेईई मेन परीक्षेचे एक आणखी सत्र आयोजित केले जाईल. JEE Main 2021 च्या मे सत्राची परीक्षा इंजीनियरिंग, आर्किटेक्चर आणि प्लानिंग अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी होईल. जेईई मेन मे २०२१ च्या निकालानंतर एनटीए ऑल इंडिया रँक लिस्ट जारी करेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/326w6jW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments