Also visit www.atgnews.com
SSC SI, ASI Exam 2019: दिल्ली पोलीस, CAPF SI, CISF ASI पेपर-2 स्थगित
SSC SI, Delhi Police, CAPF and CISF ASI Exam 2019 Postponed: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सब-इन्स्पेक्टर (SI) आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा 2019 चे नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. आयोगाने देशभरात वाढत चाललेल्या करोना (Covid 19) महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs) मध्ये सब-इन्स्पेक्टर आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर भरती परीक्षा 2019 पेपर-2 परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. (SSC) द्वारा जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार, देशभरात COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे दिल्ली पोलीस, CAPF मध्ये SI आणि CISF परीक्षा - 2019 मध्ये ASI पेपर-2 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा परीक्षा ८ मे २०२१ रोजी आयोजित होणार होती. परिपत्रकात म्हटलं आहे की या भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल. SSC चा आवश्यक सल्ला आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत वेबसाइट वर परीक्षेसाठी नव्याने सुधारित तारखांची घोषणा केली जाईल. अद्ययावत माहितीसाठी उमदेवांरांनी संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी. पदांची माहिती दिल्ली पोलीस सब-इन्स्पेक्टर (SI) पुरुषांसाठी एकूण १३२ रिक्त जागा आणि महिलांसाठी ७९ रिक्त जागा आहेत. तर सीएपीएफ (CAPFs) मध्ये SI च्या एकूण २५३४ रिक्त जागा आहेत. पात्र उमेदवार एकूण ४,०३५ महिला उमेदवार आणि ४१,८८८ पुरुष उमेदवार ओपन व्हेकन्सीसाठी पात्र ठरले होते. विभागीय जागांसाठी ३९० उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले गेले होते आणि १२३ पुरुषांना माजी सैनिकांच्या (दिल्ली पोलीस) विशेष श्रेणींतर्गत शॉर्टलिस्ट केलं गेलं होतं. हे सर्व उमेदवार ८ मे रोजी पेपर २ च्या परीक्षेत सहभागी होणार होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tPUzXa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments